
एमपीएससी / यूपीएससीहडप्पाकालीन संस्कृतीत तब्बल ५ हजार वर्षांपूर्वी 'हर्बल शॅम्पू' आणि साबणाचा वापर! बनवाली उत्खननातून उलगडले प्राचीन केशसौंदर्याचे रहस्य
हडप्पा संस्कृतीतील नागरिक केवळ प्रगत नगररचना आणि व्यापारातच नव्हे, तर पाच हजार वर्षांपूर्वी वैयक्तिक स्वच्छता, शरीरशुद्धी आणि केशसौंदर्याबाबतही अत्यंत जागरूक होते, हे बनवाली येथील उत्खननात सापडलेल्या आवळा, शिकेकाई आणि सॅपोनिनयुक्त घटकांच्या अवशेषांवरून सिद्ध झाले आहे. हजारो वर्षांपूर्वीचे हे पारंपरिक नैसर्गिक ज्ञान आजही आधुनिक सौंदर्य प्रसाधनांमध्ये तितकेच प्रासंगिक असल्याचे या वैज्ञानिक संशोधनाने अधोरेखित केले आहे.